शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

पाटण नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेला अमृत 2.0 योजनेअंतर्गत मिळणार 19 कोटी 70 लाखाचा निधी. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे पाठपुराव्याला यश.

 

                                                                         



 

दौलतनगर दि.29: पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला अमृत 2.0 कार्यक्रमांतर्गत मंजूरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री  ना. शंभूराज देसाई यांनी केल्या होत्या.त्यानुसार पाटण नगरपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाने पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा सुधारित अंदाजपत्रके आराखडयासह असणारा प्रस्ताव तांत्रिक मंजूरीसाठी प्रस्तावित केला होता. त्यानुसार अमृत 2.0 या योजनेअंतर्गत पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित 19 कोटी 69 लक्ष 52 हजार इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता देण्यात आली असून लवकरच पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाकरीता प्रशासकीय मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर नगर विकास विभागाकडे दाखल केला असून राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे या नळ योजनेच्या प्रस्तावाला तातडीने मंजूरी मिळण्याची विनंती ना.शंभूराज देसाई करणार असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली असून पाटण नगरपंचायतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.

                 पाटण नगरपंचायती  अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने  पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांची पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत होती. ऐन पावसाळयामध्ये पाटण शहारामध्ये टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ पाटण वासियांवर आली होती. दैनंदिन पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे पाटण येथील स्थानिक नागरिकांचे मोठे हाल होत होते.त्यामुळे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण नगरपंचायती अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर होण्याकरीताचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पाटण नगरपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाटण शहारांतर्गत नव्याने कार्यान्वित करावयाच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे सर्व्हेक्षण करुन रक्कम रुपये 21 कोटी 44 लाख 57 हजार रुपयांचा सुधारित आराखडा तयार करुन संबंधित विभागाकडे दाखलही करण्यात आला. दाखल प्रस्तावावर पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  संबंधित विभागाचे मुख्य अभियंता यांना तांत्रिक मान्यता देण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या.त्यानुसार राज्य उच्चाधिकार सुकाणू समितीने शिफारस केल्यानुसार पाटण नगरपंचायतीचे नविन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 19 कोटी 70 लक्ष रुपये तत्वत: मंजूर केले असून या  नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकाची विभागीय आणि मंडळ स्तरावर तपासणीही करण्यात आली आहे.तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कराड विभाग आणि मंडळ कार्यालय पुणे यांनी तांत्रिक मंजूरीसाठी सादर आणि शिफारस केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने पाटण नगरपंचायतीने सादर केलेल्या पाटण येथील नवीन नळ पाणी पुरवठा येाजनेच्या अंदाजपत्रकाच्या  19 कोटी 69 लक्ष 52 हजार इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेला  सुधारित तांत्रिक मान्यता दिली असल्याचे सांगत पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी नगरविकास विभागाकडील पाटण नगरपंचायतीचे नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यतेकरीता नगरविकास विभागाकडे दाखल प्रस्तावाबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे तातडीने मान्यता मिळण्यासाठी विनंती केलेली असून पाटण येथील नवीन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला लवकरच शासनस्तरावर मान्यता मिळणार असल्याने पाटण नगरपंचायत हद्दीतील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

आता मुंबईला जायचंच; मनोज जरांगे यांचा पदयात्रेचा मार्ग ठरला;

आता मुंबईला जायचंच; मनोज जरांगे यांचा पदयात्रेचा मार्ग ठरला;


 

मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार असून, मुंबई दौरा कसा असणार याची रूपरेषा जाहीर करण्यात आलेली आहे.20 जानेवारीला आंतरवाली सराटीमधून सकाळी 9 वाजता पायी दिंडी मुंबईकडे निघणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. तर, आंतरवाली सराटी- अहमदनगर-पुणेमार्गे मुंबईला ही पायी दिंडी पोहचणार आहे.

मनोज जरांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "जालना,शहागड, गेवराई (बीड), अहमदनगर, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खराडी, शिवाजीनगर, पुणे असे दिंडी पोहचेल. त्यानंतर पुढे पुणे, मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे आझाद मैदानावर ही पायी दिंडी पोहचणार आहे. दिंडीच्या आसपासच्या गावातल्या लोकं त्या-त्या ठिकाणी दिंडीत सहभागी होतील. सगळ्या नियोजनाचं पीडीएफ तयार करून कार्यकर्त्यांना व्हॉट्सॅपच्या माध्यमातून पाठवण्यात येणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे.

जरांगेंचं आंदोलकांना आवाहन

रोज वापरासाठी लागत असलेल्या वस्तू सोबत घेण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी आंदोलकांना केलं आहे. मुंबईत जाईपर्यंत जेवणाची व्यवस्था करावी लागणार नाही.


शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

नरबळी कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करावी - माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण.

  

                                                                        




माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नरबळी बाबत राज्यातील घडलेल्या घटनांबाबत "औचित्याचा मुद्दा" माध्यमातून विधानसभेत प्रश्न विचारीत सरकारला सूचना केल्या कि, राज्यात नरबळी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या कायद्याचे नियम तात्काळ करावेत.

६ डिसेंबर 2023 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हुंडापुरी गावात एका तांत्रिकाचा त्याच्या पत्नीचा व त्याच्या दहा वर्षाच्या नातीचा असा ट्रिपल खून अंधश्रद्धेतून करण्यात आला. संबंधित मांत्रिक हा साठ वर्षीय तांत्रिक होता तो वेगळ्या प्रकारची औषधे लोकांना देत होता, पण त्यामधून लोकांना कोणताही फायदा न होता त्याचा त्रास होत असल्याने गावातील लोकांनी त्या मांत्रिकाचा त्याच्या बायकोचा व त्याच्या नातीचा निर्घृण खून केला. अशी माहिती विधानसभेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी देऊन एका अत्यंत महत्वाच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

तसेच पुढे त्याचप्रकारची राज्यातील काही घटनांची माहिती देताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, मालेगाव मध्ये जुलै 2023 मध्ये गुप्तधनाकरिता कृष्णा अनिल सोनवणे याने ८ वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून केला होता, तसेच 2019 मध्ये मंगळवेढ्यातील प्रतीक विश्वेश्वर या 9 वर्षाच्या मुलाचा नरबळी दिला होता. माझ्या तालुक्यातील एका गावामध्ये बारावीच्या मुलीचा खून झालेला होता तो एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून आई-वडिलांनी केला असे सांगण्यात येते. अजूनही ते प्रकरण मिटलेले नाही.

राज्यात २०१४ पूर्वी आघाडी सरकार असताना महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचा कायदा 2013 साली पारित करण्यात आलेला होता, काही दिवसापूर्वी घडलेली गडचिरोली येथील घटना असेल, मालेगावची अथवा सोलापूरची घटना असेल यावरून हेच लक्षात येते कि, जरी 2013 साली नरबळी कायदा पारित केला असला तरी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही कारण या कायद्याचे नियम केले गेले नाहीत. त्यामुळे या कायद्याची नक्की अंमलबजावणी कशी करावी हे अजून समजत नाही. 2021 चे आकडे आहेत की दर महिन्याला एक नरबळी महाराष्ट्रात जातो. बारा महिन्यात 13 नरबळी झाले असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन यांच्या माहितीच्या आधारे समजते. प्राध्यापक श्याम मानव याबाबतीत खूप चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने नरबळी विरोधात कायदा केलेला आहे. यानंतर कर्नाटक व केरळ या राज्याने कायदे केले, पण त्यांनी आपल्या राज्यात नियम केलेले आहेत. अजूनही महाराष्ट्रात या कायद्याचे नियम न केल्याने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी  होत नाही. म्हणून या अत्यंत महत्वाच्या घटनेकडे औचित्याचा मुद्दा च्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की, ताबडतोब या नरबळी कायदा संदर्भात नियम करावेत तसेच या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि या कायद्यानुसार  वर्षातील आकडेवारी प्रकाशित करावी म्हणजे या कायद्याचा किती वापर आपल्या राज्यात होतोय हे आपल्याला समजेल.

डाॅ.संदीप डाकवे यांना ऑल जर्नालिस्ट अँण्ड फ्रेंड्स सर्कलचा प्रेरणा पुरस्कार जाहीर.

 डाॅ.संदीप डाकवे यांना ऑल जर्नालिस्ट अँण्ड फ्रेंड्स सर्कलचा प्रेरणा पुरस्कार जाहीर.

 


 



तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना ऑल जर्नालिस्ट  अँण्ड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी डॉ. डाकवे यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी महाराष्ट्र शासनाचे 5 पुरस्कार मिळाले आहेत. नांदेड येथील नरहर कुरुंदकर सभागृह पिपल्स काॅलेज नांदेड येथे रविवार दि.24 डिसेंबर, 2023 रोजी होणाऱ्या 18 व्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात हा पुरस्कार डाॅ.संदीप डाकवे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
डाॅ.डाकवे यांच्या नावाची नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड, हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड, इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड, द ग्रेटेस्ट इंडियन या पुस्तकात झाली आहे
डाॅ.संदीप डाकवे यांनी पत्रकारितेसोबत 60 च्यावरती विविध पुस्तके, मासिके, दिवाळी अंक, नियतकालिके, अहवाल, स्मरणिका इ.ची कल्पक मुखपृष्ठ साकारली आहेत. याशिवाय त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासताना गरजूंना सुमारे एक लाखापेक्षा जास्त रकमेची रोख आर्थिक मदत केली आहे.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे


बुधवार, २० डिसेंबर, २०२३

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने तात्काळ घ्याव्यात - माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची विधानसभेत मागणी.


                                                                   



 नागपूर: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका गेली २ वर्षाहून अधिक वर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी प्रशासकच्या माध्यमातून कारभार सुरु आहे. त्यामुळे जिथे प्रशासक आहेत अशा ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या अभावी लोकांचे प्रश्न मार्गी लागण्यात अडथळे येत असल्याचे दिसून येते यामुळे सरकारने तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.  

तसेच पुढे बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, पंधराव्या वित्त आयोगाच्या नियमाप्रमाणे 2021 ते 2025 पर्यंत या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राला एकूण 22 हजार 713 कोटी निधी हा फक्त ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणार आहे. परंतु केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की ज्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका झाल्या नाहीत व जिथे प्रशासक आहेत त्या ठिकाणी केंद्राचा हा निधी मिळणार नाही. त्याप्रमाणे राज्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने सुद्धा शासन आदेश काढलेला आहे.

आपल्या राज्यामध्ये जवळजवळ दोन वर्ष ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे हा जवळपास आठ हजार कोटी रुपयांचा हक्काचा निधी ग्रामीण भागातील जनतेला मिळणार नाही. त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे कि, हा निधी तरी मिळाला पाहिजेच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे निवडणुका झाल्या पाहिजेत. निवडणुकांसाठी जे राजकीय आरक्षण आहे जे आपण एससी एसटी ओबीसी यांना देतो ते सुद्धा मिळालेले नाही, त्यावर तोडगा काढून ताबडतोब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत व हा निधी केंद्र शासनाकडून आपल्याला मिळण्याबाबत प्रयत्न केले पाहिजेत. जोपर्यंत या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत केंद्र सरकारसोबत आपण संपर्क साधावा आणि जो राज्याचा हक्काचा निधी आहे तो घेण्यात यावा व ज्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये लोकप्रतिनिधी नसतील तिथे येणारा निधी आमदारांच्या माध्यमातून वितरित व्हावा

मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३

कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याची माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची लक्षवेधीद्वारे मागणी.

कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याची माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची लक्षवेधीद्वारे मागणी.                                                      




राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. या अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली.  

कराड चिपळूण रेल्वे मार्ग हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे, याबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून 21 मार्च 2023 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचना मांडली होती. त्यावेळी बंदरे व खनीकर्म मंत्री यांनी सभागृहाला आश्वासित केलं होत की, या प्रकल्पाबद्दल राज्य शासन केंद्र शासनाकडे कोणत्या प्रकारची चर्चा करत आहे किंवा कोणता पाठपुरावा चालू आहे याची माहिती देण्याकरिता एका महिन्याच्या आत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक घेऊ. पण आता जवळपास आठ ते नऊ महिने होऊनसुद्धा कोणत्याही प्रकारची बैठक शासनाकडून घेतली गेली नाही, त्यामुळे आ. चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारचे या महत्वाकांक्षी प्रकल्पाकडे लक्ष वेधले. तसेच आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाला दोन प्रश्न विचारले  पहिला प्रश्न होता २०२३ च्या बजेट सेशनमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न विचारला असता मंत्रिमंडळाने आश्वासन दिले होते की या प्रकल्पाबाबत महिनाभरात बैठक घेतले जाईल त्या आश्वसनाचे काय झाले? तसेच दुसरा प्रश्न विचारला, नीती आयोग गेली चार ते पाच वर्ष या प्रकल्पाचा अभ्यास करत आहे त्याबद्दल राज्य शासनाने कोणत्या प्रकारचा पाठपुरावा केला आहे. या दोन प्रश्नांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

पुढे आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, कराड ते चिपळूण सह्याद्रीच्या डोंगर रांगेतून तसेच बोगद्याच्या मार्गातून जाणारा रेल्वे प्रकल्प हा रेल्वे मंत्रालयाच्या बजेटमध्ये आहे. हा प्रकल्प राज्य शासनाने बजेटमध्ये मंजूर केलेला होता. आमचे जेव्हा आघाडी सरकार होते तेव्हा 2012 मध्ये 50:50 टक्के निधी देऊन हा 928 कोटींचा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत 928 कोटी रुपये होती. हा प्रकल्प कोकण पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा राज्याकरिता अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे, म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली होती. 2014 ला सरकार बदलल्यानंतर नवीन सरकारने नवीन कन्सल्टंट ला या प्रकल्पाचा अभ्यास करून अहवाल देण्यास सांगितले त्यांनी या प्रकल्पाची किंमत रु. 3196 म्हणजे जवळपास 3200 कोटी रुपये असं अहवालातून नमूद केले. आमच्या सरकारने 50:50 टक्के म्हणजे केंद्र सरकार 50% व राज्य सरकार 50% या धर्तीवर प्रकल्प करण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. त्यानंतर २०१४ साली आलेल्या नवीन राज्य सरकारने निर्णय घेतला की हा 3200 कोटीचा प्रकल्प आता आपण पीपीपी प्रमाणे करू आणि त्यानुसार केंद्राशी करार झाला.
          14 ऑगस्ट 2016 रोजी मुंबईतील शासकीय सह्याद्री अतिथीगृहामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कोकण रेल्वे व शापूरजी पालमजी यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. या कार्यक्रमात आ. पृथ्वीराज चव्हाण सुद्धा उपस्थित होते. या करारानंतर 11 जून 2017 रोजी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे कराडला आले होते व त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या महत्त्वाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले तरी त्याच्यामध्ये आजपर्यंत काहीच प्रगती झाली नाही. या प्रकल्पामध्ये दहा रेल्वे स्थानक आहेत जे सातारा व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत कोकणातील जवळपास आठ बंदरे या रेल्वेस्थानकाशी जोडली जाणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा व राज्याच्या दृष्टीने महत्वकांक्षी प्रकल्प आहे व तो लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडून काय प्रयत्न झाले व हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी  शासनाकडून प्रयत्न व्हावेत अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

आ. चव्हाण यांच्या प्रश्नावर मंत्री दादा भुसे यांनी उत्तर देताना सांगितले कि, अर्थसंकल्प अधिवेशनात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मागणी केली होती, त्यावेळी रेल्वे मंत्र्यांच्यासोबत बैठक जरी होऊ शकली नसली तरी येत्या महिन्यात मुख्यमंत्री व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित केली जाईल व या प्रकल्पाची सद्य स्थिती मांडली  जाईल.
----------------------------------------

सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

एडीबी अर्थसहाय्य योजनेतून मल्हारपेठ मसूर मायणी राज्यमार्गासाठी 480 कोटींचा निधी मंजूर. मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश.

.


 

दौलतनगर दि.18: पाटण विधानसभा मतदारसंघातून सुरु होणारा मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा राज्य मार्ग क्रमाक 143 वाहतूकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून मुंबई पुणे बेंगलोर आशियाई महामार्ग व विजापूर कराड चिपळूण गुहाघर राष्ट्रीय महामार्ग या दोन महामार्गांना जोडणाऱ्या या  राज्यमार्गावर दैनंदिन वाहतूक मोठया प्रमाणांत सुरु असते. या राज्य मार्गावरील पंढरपूर ते मायणी या रस्त्याचे काम पुर्ण झाले असून मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर मधील लांबीतील रस्ता खराब झाल्याने दळण वळणाची मोठी गैरसोय होत होती. मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर या राज्य मार्गाचे मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे लांबीची सुधारणा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आग्रही विनंती  करत या रस्त्याचे कामाला निधी मंजूर होण्यासाठी गेली दिड वर्ष सातत्याने पाठपुरावा करत होते.त्यानुसार मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा राज्य मार्ग क्रमाक 143 मधील मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे लांबीची सुधारणा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून 480 कोटी  रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

                   सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातून सुरु होणारा मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा रस्ता राज्यमार्ग क्रमांक 143 आहे. सदर रस्ता मुंबई पुणे बेंगलोर आशियाई महामार्ग व विजापूर कराड चिपळूण गुहाघर राष्ट्रीय महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा तसेच सातारा,सांगली व सोलापूर या तिन्ही जिल्हयातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर साखर कारखाने व इतर महत्त्वाचे उद्योगधंदे तसेच मोठया लोकसंख्येची मुख्य बाजारपेठा असलेली गावे आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठया प्रमाणांत वाहतूक वर्दळ असते. दरम्यान या रस्त्याचे मार्गावरील मायणी ते पंढरपूर या सोलापूर जिल्हयातील लांबीचे काम नुकतेच पूर्ण झालेले असून सातारा जिल्हयातील मल्हारपेठ ते मायणी ही 60 किलोमिटर लांबी खराब झालेली असल्याने या मार्गावरुन ये-जा करताना वाहनधारकांसह प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर या राज्य मार्गाचे मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे लांबीची सुधारणा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी गत दिड वर्षापासून आग्रहाची विनंती केलेली होती. त्यानुसार मल्हारपेठ पंढरपूर या मार्गावरील  मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर खराब लांबीचे सविस्तर सर्वेक्षण (DPR) तयार करण्यात येऊन मल्हारपेठ ते मायणी या रस्त्याचे लांबीचे 480 कोटी किंमतीचे अंदाजपत्रक मंजूरी साठी सादर करण्यात आल्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे ना.शंभूराज देसाई यांनी गत दिड वर्षापासून पाठपुरावा करत होते. त्यानुसार मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा राज्य मार्ग क्रमाक 143 मधील मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे लांबीची सुधारणा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून 480 कोटी  रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून  मल्हारपेठ ते मायणी या खराब लांबीचे नुतनीकरण झाल्यानंतर मल्हारपेठ ते पंढरपूर ही सलग लांबी वाहतुकीसाठी सोईची होणार आहे.दरम्यान एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून मंजूर मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा राज्य मार्ग क्रमाक 143 मधील मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे मंजूर 480 कोटी  रुपयांचे कामाची निविदा प्रक्रिया तातडीने करण्यात येऊन मंजूर असलेले काम लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचना ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना केल्या असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत नमूद केले आहे.

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजूंना २१ लाख १५ हजाराची मदत.


 


कराड, प्रतिनिधी : नेहमीच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर बारकाईने लक्ष देणाऱ्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे मतदारसंघातील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यासाठी शिफारस केली होती. आ. चव्हाण यांच्या शिफारशीनुसार २१ लाख १५ हजार रुपयांची गरजूंना मदत मिळाली आहे. मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई येथून याबाबतचे पत्र आ. चव्हाण यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे.

सदरच्या पत्रात म्हंटले आहे की, १ जुलै २०२२ ते १ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत व्हावी. अशी शिफारस असणारे पत्र मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना आ. चव्हाण यांना दिले होते. गरजू रुग्णांची यादी व त्याप्रमाणे २१ लाख १५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आ. चव्हाण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहेत. त्यांनी गावोगावी विकासाचा निधी पोहचवत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवली आहे. विकासाबरोबर ते मतदरसंघातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याकडे गतवर्षी गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत व्हावी, याकरिता विनंती केली होती. सदरच्या गरजू रुग्णांची यादी जोडत आ. चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीसाठी शिफारस केली होती.

यावर नुकतेच ना. शिंदे यांनी २१ लाख १५ हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याचे आ. चव्हाण यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. हा निधी प्राप्त झाल्याने गरजूंना मोलाची मदत होणार आहे.

 

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, टोल फ्री १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू करण्याची योजनांची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयाची या निमित्ताने आठवण झाल्याचे सांगता येईल.


मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 40 कोटींचा निधी मंजूर.

 

माहे डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 40 कोटींचा निधी मंजूर.

 


साप्ताहिक वृत्तपत्र कुमजाई पर्व

दौलतनगर दि.12: पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे व पूलांचे पुनर्बांधणीचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारस केली होती.सध्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील  राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

               प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले की, पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे मोठे प्रमाणांत नुकसान झाले होते.त्यामुळे या रस्त्यांवरुन  प्रवास करताना अनेक अडचणी येत होत्या. या राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे तसेच बाचोली व खळे येथील पुलांचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारस केली होती. 

                                                                 साप्ताहिक वृत्तपत्र कुमजाई पर्व

त्यानुसार नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा-58 कि.मी. 14/00 ते 17/00 ची सुधारणा करणे (भाग- दिवशी घाट) 02 कोटी, बनपुरी अंबवडे कोळेकरवाडी उमरकांचन  रस्ता प्रजिमा 125 कि.मी. 0/00 ते 13/00 (भाग कि.मी.7/00 ते 10/00 - जौंजाळवाडी ते  अंबवडेफाटा) ची रुंदीकरणासह सुधारणा 02 कोटी, चरेगांव चाफळ दाढोली महाबळवाडी येरफळे त्रिपुडी चोपडी बेलवडे आंब्रुळे कुसरुंड नाटोशी रस्ता प्रजिमा 53 कि.मी. 40/00 ते 42/00  ची सुधारणा 03 कोटी, 

                                                                          साप्ताहिक वृत्तपत्र कुमजाई पर्व

मानेगांव ते कुंभारगाव गलमेवाडी रस्ता प्रजिमा 56 कि.मी. 3/00 ते  6/700 (कुंभारगांव ते  गलमेवाडी) ची सुधारणा 02 कोटी, भोसगांव आंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले कारळे पानेरी रस्ता प्रजिमा 122 कि.मी.0/00 ते 22/500 (भाग कि.मी.12/00 ते 17/00-(कारळे ते तामिणे ) ची  रुंदीकरणासह सुधारणा 02 कोटी, बनपूरी आंबवडे कोळेकरवाडी उमरकांचन रस्ता प्रजिमा 131 कि.मी.6/500 ते 11/500 ची सुधारणा 02 कोटी, चरेगाव चाफळ रस्ता प्रजिमा 53 कि.मी.12/00 ते 15/300 मध्ये घाट लांबीतील सुधारणा 02 कोटी, चरेगाव चाफळ रस्ता प्रजिमा 53 कि.मी.5/600 ते 12/00 भाग चाफळ ते दाढोली रस्त्याची सुधारणा 2.50 कोटी,  

                                                                               साप्ताहिक वृत्तपत्र कुमजाई पर्व   


कोंजवडे भुडकेवाडी वरची केळेवाडी प्रजिमा 129 कि.मी.5/00 ते 10/00 मध्ये सुधारणा 02 कोटी, काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी प्रजिमा 134 कि.मी.04/00 ते 7/00 मध्ये रुंदीरकरणासह सुधारणा 2.50 कोटी, मल्हारपेठ मंद्रुळहवेली पानस्करवाडी जमदाडवाडी नवसरवाडी प्रजिमा 133 कि.मी.0/00 ते 2/00 भाग मल्हारपेठ ते जमदाडवाडी रस्त्याची सुधारणा 2 कोटी,

                                                                               साप्ताहिक वृत्तपत्र कुमजाई पर्व

 

 रामा 04 ते वराडे भोळेवाडी ते रामा 136 ते साकुर्डी तांबवे सुपने जुनी पाडळी गावठाण ते वारुंजी ते रामा 136 रस्ता प्रजिमा 79 व किमी 16/500 ते 19/00 भाग सुपने पूल ते जुनी पाडळी ची सुधारणा 2 कोटी, मल्हारपेठ पंढरपूर रस्ता रामा 143 कि.मी.02/600 ते 6/00, 9/00 ते 1/800 भाग ऊरुल फाटा ते भोळेवाडी फाटा व कळंत्रेवाडी फाटा ते उंब्रज ची सुधारणा   02 कोटी, पाटण मणदुरे जळव तारळे रस्ता रामा 398 कि.मी.4/00 ते 5/00 व 18/00 ते 24/00 भाग बिबी ते देवघर फाटा व जळवखिंड ते मरळोशी ची सुधारणा 02 कोटी, 

                                                                              साप्ताहिक वृत्तपत्र कुमजाई पर्व

 

प्रजिमा-55 ते  बाचोली पोहोच  रस्ता  ग्रामा. 289 वर बाचोली येथे वांग नदीवर मोठा पुल 05 कोटी,खळे पोहोच रस्ता ग्रा.मा.  323 वर    कि.मी. 0/800   येथे खळे गावाजवळ  वांग नदीवर  मोठा पुल 05 कोटी या कामांना सध्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील  राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात ८ कोटी ७० लाख ६९ हजाराचा निधी मंजूर.

 आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात ८ कोटी ७० लाख ६९ हजाराचा निधी मंजूर.




 कराड : जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजना २०२३ - २४ मधून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ८ कोटी ७० लाख ६९ हजार इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीतून आ. चव्हाण यांनी मतदरसंघातील
समतोल राखला आहे. अशी माहिती आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयातून प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली.

प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हंटले आहे की, केंद्रीय पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री, राज्यसभा व लोकसभेचे खासदार असल्यापासून सातारा आणि कराड परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना हजारो कोटी रुपयांचा निधी आणत मतदारसंघाचा कायापालट केला.

गेली नऊ वर्षे आ. चव्हाण कराड दक्षिणचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या नऊ वर्षातही त्यांनी विकासाची प्रक्रिया निरंतर चालू ठेवली आहे. जिल्हा नियोजन समितीकडे चालू आर्थिक वर्षात आ. चव्हाण यांनी विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती. या मागणीनुसार मतदारसंघात मंजूर झालेली विकासकामे व कंसात मंजूर निधी पुढीलप्रमाणे ; नागरी सुविधा 2023-24 अंतर्गत वडगाव हवेली येथे १५ लाख रुपये,
कार्वे (१० लाख). डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत आणे (१२ लाख), भरेवाडी (५ लाख), लटकेवाडी (५ लाख), शेवाळेवाडी - येवती (१० लाख), राज्य विद्युत वितरण कंपनीकडून येरवळे (८ लाख ८८ हजार), विंग (८ लाख १७ हजार), पोतले (१२ लाख ४९ हजार), कार्वे (२ लाख ६० हजार), कार्वे (१ लाख ७५ हजार) कोळे (५ लाख २१ हजार)


प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे दुरुस्ती 2023-24 अंतर्गत कापील (५ लाख), कोडोली (५ लाख), कार्वे (५ लाख), अंगणवाडी इमारत दुरुस्ती 2023-24 अंतर्गत काले - 83  (१ लाख), काले - 84 (१ लाख), खुबी - 110 (१ लाख), येणपे - 321 (१ लाख), शेवाळवाडी - 49 (१ लाख), टाळगाव नवीनसाठी (१ लाख), काजारवाडी - मिनी (१ लाख), माटेकरवाडी - 161 (१ लाख), बांदेकरवाडी - 15 (१ लाख), म्हासोली - 163 (१ लाख), शेवाळवाडी - येवती (१ लाख), शेवाळवाडी - म्हासोली (१ लाख), घराळवाडी - 50 (१ लाख), काटेकरवाडी 106 (१ लाख), जनसुविधा 2023-24 अंतर्गत वारुंजी (७ लाख), गोटे (७ लाख), मुंढे (७ लाख), घारेवाडी (७ लाख), आणे (७ लाख), येरवळे (७ लाख), संजयनगर - शेरे (७ लाख), रेठरे बुद्रुक (७ लाख), रेठरे खुर्द (७ लाख)
नारायणवाडी (७ लाख), जुजारवाडी (७ लाख), शिंदेवाडी - विंग (७ लाख), नांदगाव (६ लाख)


3054 सन 2023-24 अंतर्गत रेठरे खुर्द (२० लाख), वारुंजी (३५ लाख), घराळवाडी (२० लाख), घोगाव (२५ लाख), कासारशिरंबे (२० लाख), मुळीकवाडी - गोटेवाडी (२० लाख), 5054 सन 2023-24 अंतर्गत वहागाव - घोणशी - कोपर्डे हवेली - पार्ले बनवडी रस्ता सुधारणा करणे (५० लाख), येवती - घराळवाडी - मस्करवाडी - चव्हाणवाडी - धामणी - डाकेवाडी - निवी रस्ता ते कराड हद्द सुधारणा करणे (४० लाख)

क वर्ग तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत आटके (१० लाख), विशेष घटक साकव कार्यक्रम अंतर्गत कोळे (३९ लाख १७ हजार), सर्वसाधारण साकव कार्यक्रम अंतर्गत बांदेकरवाडी - सवादे (५९ लाख ७२ हजार) जिल्हा परिषद शाळा खोल्या दुरुस्ती अंतर्गत म्हासोली (३ लाख), कोळे (३ लाख), जिल्हा परिषद नवीन शाळा खोली बांधणे अंतर्गत मंजूर कामे गोटे (११ लाख ८२ हजार), वहागाव (११ लाख ८२ हजार)

साठवण बंधारा बांधणे अंतर्गत सवादे (५० लाख ५८ हजार), तुळसण - सवादे (४६ लाख ७० हजार), सवादे - गट नं. 273 (३३ लाख ६४ हजार), सवादे - शेरी (३९ लाख ४६ हजार), सवादे येथे साठवण बंधारा (२० लाख ८ हजार), पवारवाडी - नांदगांव (२७ लाख १४ हजार), स्मार्ट आरोग्य केंद्र, कोळे (७० लाख) अशा आठ कोटी ७० लाख ६९ हजार रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.

---------------------------


 नुकताच आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड विमानतळासाठी २२१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. कराड शहरालगत चौपदरी रस्त्यांचे जाळे, भूकंप संशोधन केंद्र, आरटीओ ऑफिस या लक्षवेधी कामांच्या माध्यमातून आ. चव्हाण यांनी सुमारे २ हजार कोटी पर्यंतचा निधी आणला आहे. तर नुकताच विमानतळासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी कराडच्या विकासासाठी आणखी उपयुक्त ठरणार आहे, हे नक्की .
-------------------------------

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कार्वे गावासाठी ४ कोटी २२ लाखाचा निधी*

*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कार्वे गावासाठी ४ कोटी २२ लाखाचा निधी* 

 कराड :माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून तसेच कार्वे गावचे माजी सरपंच वैभव थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जल जीवन मिशन अंतर्गत कार्वे गावातील गोपाळनगर व वाढीव वस्तीसाठी ३ लाख लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली असून ४ कोटी २२ लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर झाला आहे. याबाबतचे मंजुरी पत्र कार्वे गावचे माजी सरपंच वैभव थोरात, ग्रामपंचायत सदस्य सागर देसाई, अभिजीत वायदंडे, विठ्ठल हुलवान आदींनी ग्रामस्थांच्या वतीने आ. चव्हाण यांच्याकडून स्वीकारले. यावेळी युवानेते इंद्रजित चव्हाण, स्वीय सहायक गजानन आवळकर उपस्थित होते. कार्वे गावच्या पिण्याच्या पाणी योजनेसाठी इतका भरघोस निधी मंजूर केल्याबद्द्ल माजी सरपंच वैभव थोरात व ग्रामपंचायत सदस्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार मानले. 

कार्वे गावासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१३-१४ साली पेयजल योजना मंजूर झालेली होती. या योजनेचा विस्तार संपूर्ण गावामध्ये १६ कि.मी. इतका असून वॉर्ड क्र. ४ मध्ये पाण्याची टाकी २.५० लाख लिटर व वॉर्ड क्र. ५ मध्ये पाण्याची टाकी १.६५ लाख लिटर एवढी क्षमता आहे. तसेच त्यानंतर गोपाळनगर व आसपासच्या वस्तीसाठी ३ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व योजना मंजूर होणे आवश्यक असल्याने हि योजना मंजूर करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता व हि योजना गावासाठी अत्यंत महत्वाची असल्याने कार्वे गावच्या वस्त्यासाठी ४ कोटी २२ लाखांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे.  या माध्यमातून कार्वे गावच्या आसपासच्या वस्त्यासाठी मंजूर झालेल्या निधीतून पाणी योजना लवकरच पूर्ण होऊन स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार 24 बाय 7 योजनेतून मिळणार आहे.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...