गुरुवार, १५ जून, २०२३

कुंभारगाव - श्री.अनिल राजाराम मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शेंडेवाडीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन परिसरातील नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

 

 


अनिल राजाराम मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा शेंडेवाडी कृष्णा हॉस्पिटल कराड यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा परिषद शाळा शेंडेवाडी येथे उद्या शुक्रवार दि.16 जून  रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान हे शिबिर होणार आहे.

या शिबिरात खालील मोफत तपासण्या व उपचार करण्यात येणार आहेत  - स्त्रीरोग तज्ञ,बालरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ ,अस्थिरोग तज्ञ ,मधुमेह हृदयरोग नेत्ररोग तज्ञ, शल्यविशारद तज्ञ,कान नाक घसा तज्ञ,असे विविध प्रकारचे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत ही तपासणी होणार आहेत.


तरी परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
तसेच श्री.मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेंडेवाडी गावात घरोघरी वृक्ष वाटप करण्यात येणार आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

थकीत कर्ज न भरणाकेल्याने दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल.

कर्ज न भरणार्‍यास दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल. पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत...