बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

मान्याचीवाडी मंदिरात नामजप व भंडाऱ्याचे आयोजन

मान्याचीवाडी मंदिरात नामजप व भंडाऱ्याचे आयोजन
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी डोंगरावरची (गुढे) येथे श्री विठ्ठल रखुमाई भंडारा उत्सवानिमित्त नामजप यज्ञ सोहळयाचे नियोजन शुक्रवार दि.23 डिसेंबर, 2022 ते रविवार दि.25 डिसेंबर, 2022 अखेर करण्यात आले आहे. या सोहळ्याचे व्यासपीठचालक ह.भ.प. रामचंद्र महाराज शिद्रुक आहेत.
 शुक्रवार दि.23 डिसेंबर रोजी ह.भ.प. उदय मोरे साईकडे यांचे प्रवचन, ह.भ.प. विजय महाराज सपकाळ यांचे कीर्तन, शनिवार दि.24 डिसेंबर रोजी ह.भ.प. आराध्या अमोल कदम यांचे प्रवचन आणि ह.भ.प. निर्मला महादेव घारे यांचे कीर्तन, रविवार दि.25 डिसेंबर रोजी ह.भ.प.प्रा.डाॅ.प्रदीप यादव साईकडे यांचे प्रवचन आणि ह.भ.प.राजाराम महाराज माने यांचे कीर्तन यांचे कीर्तन होईल. याच दिवशी दुपारी 2 ते 5 विठ्ठल रखुमाई मंदिर ते मान्याचीवाडी मंदिर शिबेवाडी भव्य दिंडी सोहळा होणार आहे.
शनिवार दि.24 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत हळदी कुंकू समारंभ होणार आहे.
याशिवाय दररोज सकाळी 4 ते 6 काकड आरती, सकाळी 7 वाजता विठ्ठल रखुमाई अभिषेक, सकाळी 9 ते 10 व दुपारी 3 ते 4 नामजप यज्ञ,  सायंकाळी 4 ते 6 हरिपाठ, 6 ते 7 प्रवचन, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन व नंतर जागराचा कार्यक्रम होईल. दरम्यान गुढे, शिद्रुकवाडी, दळवीवाडी, वायचळवाडी, पाचुपतेवाडी, शिबेवाडी वरची व खालची, मान्याचीवाडी, दिंडेवाडी, मान्याचीवाडी, दिंडेवाडी, कुठरे पवारवाडी, कदमवाडी, मोरेवाडी, मोळावडेवाडी, जुळेवाडी, मान्याचीवाडी, मालदन, करपेवाडी, शिवसमर्थ भजनी मंडळ, तळमावले, शिबेवाडी-मान्याचीवाडी-कुंभारवाडी कुंभारगांव व पंचक्रोशीतील भजनी मंडळ साथ करतील.
तरी या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविक, ग्रामस्थ यांनी घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ मंडळ मान्याचीवाडी, शिबेवाडी (गुढे), पाटीलवाडी (कुंभारगांव), विठ्ठल रखुमाई मंडळ मान्याचीवाडी गुढे यांनी केले आहे.

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

खा.शरद पवार यांचेकडून डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे कौतुक

खा.शरद पवार यांचेकडून डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे कौतुक

तळमावले/वार्ताहर
देशाचे माजी संरक्षण मंत्री व कृषी मंत्री खा.शरद पवार यांनी डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे कौतुक केले. डाॅ.डाकवे यांनी पवार यांना स्केच दिले. डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून भेट दिले जाणारे हे 14000 वे स्केच आहे. याप्रसंगी खा.श्रीनिवास पाटील, आ.बाळासाहेब पाटील, लेफ्टनंट जनरल पी.रास पन्नू, कर्नल संभाजी पाटील, अरुण जाधव, शारदा जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते. सदर भेट पवार यांना देण्यासाठी माजी नगरसेवक सादिक इनामदार, ऍड .संभाजीराव मोहिते, उत्तम धर्मे व विजय समारोह दिवस समितीचे सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.
डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील दिग्गजांना आपली चित्रे भेट दिली आहेत. त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. कलेच्या माध्यमातून मिळणाऱ्या मानधनातील काही रक्कम गरजूंना दिली आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांना त्यांच्या कलेची भुरळ पडली आहे.
यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री विश्वनाथ कराड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय अर्थमंत्री आनंदराव अडसूळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.आर.आर.पाटील (आबा), पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, खा.श्रीनिवास पाटील, खा.अमोल कोल्हे, खा.डाॅ.भालचंद्र मुणगेकर, खा.राजू शेट्टी, माजी खा.संभाजी छत्रपती, आ.बाळासाहेब पाटील, आ.सुनिल राऊत, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील (काका), माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी मंत्री प्रा.राम शिंदे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आ.आनंदराव पाटील, माजी आ.नरेंद्र पाटील, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर, अतुल भोसले, पांडूरंग संकपाळ, चित्राताई वाघ, पद्मश्री पोपटराव पवार इ.सह अन्य राजकीय नेत्यांना डाॅ.संदीप डाकवे यांनी चित्रे दिली आहेत.
या सर्व मान्यवरांनी डाॅ.संदीप डाकवे व त्यांनी राबवलेल्या कलात्मक उपक्रमांचे कौतुक केले आहे.

!!: डाॅ.संदीप डाकवे यांची 14000 वी कलाकृती :
डाॅ.संदीप डाकवे यांनी शरद पवार यांना दिलेली ही 14000 वी कलाकृती आहे. यापूर्वी डाॅ.डाकवे यांनी स्क्रिबलिंग मधून पवार यांचे चित्र रेखाटले होते. गतवर्षी 82 पोस्टकार्ड पाठवून वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याची नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये झाली आहे.
दरम्यान, खा. पवार यांना चित्र देताना यापूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या उपक्रमांची, कात्रणांची माहिती डाॅ.डाकवे यांनी दाखवली. पवार यांनी ती बारकाईने पाहिली. या संग्रहाचे कौतुक करत शरद पवार यांनी डाॅ.संदीप डाकवे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

तीर्थरुप तात्या’ पुस्तकातून डाॅ.संदीप डाकवे जागवणार वडिलांच्या आठवणी

तीर्थरुप तात्या’ पुस्तकातून डाॅ.संदीप डाकवे जागवणार वडिलांच्या आठवणी

तळमावले/वार्ताहर
डाॅ.संदीप डाकवे यांचे वडील स्व.राजाराम डाकवे यांचे 12 सप्टेंबर 2022 मध्ये आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने डाकवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. स्व.तात्यांच्या आठवणी जागवणारे ‘तीर्थरुप तात्या’ पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार आहे.
राजाराम डाकवे (तात्या) यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान मोलाचे होते. अनेक कार्यात ते नेहमी अग्रभागी असत. कुटूंब, शेती, प्राणी यांच्यावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. बैल, शेळी यांसह घरातील पाळीव जनावरे यांच्याशी असलेले त्यांचे नाते अतूट होते. याशिवाय ते कुटूंबवत्सल होते. शेतीमध्ये काम करताना, औजारे बनवताना, मशागत करताना, विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमात उपस्थिती अशा त्यांच्या अनेक आठवणी आज फोटोरुपाने उपलब्ध आहेत. त्या आठवणी पुस्तकाच्या रुपाने प्रसिध्द व्हाव्यात अशी संकल्पना मनामध्ये आली. यातून हे अनोखे फोटोग्राफी बुक साकारत असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे.
यापूर्वी डाॅ.डाकवे यांची दीप उजळतो आहे, स्नेहबंध, गाठीभेटी, स्मृतीगंध इ. फोटोबुक स्पदंन प्रकाशनाने प्रसिध्द केली आहेत.
राजाराम डाकवे यांच्या निधनानंतर डाकवे परिवाराने रक्षाविसर्जन नदीत न करता त्यामध्ये वृक्षारोपण केले, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन आदि नावीण्यपूर्ण उपक्रम राबवत तात्यांच्या सामाजिक कार्याला एकप्रकारे वंदनच केले.
‘तीर्थरुप तात्या’ या पुस्तकात सुसंगत फोटो, स्थळ दिनांकासह थोडक्यात व योग्य माहिती असल्याने पुस्तकाने वेगळी उंची गाठली आहे. याशिवाय डॉ. डाकवे यांनी आपल्या वडिलांची रेखाटलेली काही रेखाचित्रे देखील यात समाविष्ट केली आहेत. हे वेगळे फोटो बुक सर्वांच्या पसंतीस पडेल असा विश्वास डाॅ.संदीप डाकवे आणि त्यांच्या परिवाराने व्यक्त केला आहे.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...