सातारा : तळमावले (ता.पाटण)प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले परिसरात कुष्ठरोग व क्षयरोग शोध अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. समाजातील सर्व क्षयरोग व कुष्ठरुग्णाचा शोध घेऊन निदान निश्चितीनंतर औषधोपचार सुरू करणे अत्यंत महत्वाचे आहे. समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी महाराष्ट्र शासन दिनांक 1 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत अभियान राबविण्यात येत आहे.
कोविड सोबत आपला लढा चालू असतानाच क्षयरोग, कुष्ठरोग यासारख्या इतर संसर्गजन्य आजारांबाबत देखील आपण सदैव सजग असणे गरजेचे आहे. या आजारांबाबत प्रतिबंधात्मक अधिक प्रभावीपणे राबविण्यासोबतच जनजागृती देखील व्हावी, या प्रमुख उद्देशाने जिल्हा आरोग्य विभागाद्वारे क्षयरोग व कुष्ठरोग नियंत्रणासाठी दिनांक १ ते १६ डिसेंबर २०२० या दरम्यान विशेष शोध मोहीम राबविली जात आहे. समाजातील निदान न झालेले कुष्ठरोग व क्षयरोगाचे रुग्ण लवकरात लवकर शोधणे. संशयित क्षय रुग्णांचे थुंकी नमुने हे सीबीनॅट/ट्रयुनॅट मशिनव्दारे व एक्सरे तपासणी करणे. रुग्णांना त्वरीत मोफत औषधोपचार करणे. क्षयरोग व कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे हा या मोहीमेचा मुख्य उद्देश आहे.या आजारांच्या लक्षणांनी ग्रस्त नागरिकांनी तपासणीसाठी येणार्या पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी.पाटील यांनी केले आहे.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. उमेश गौजारी , मंगेश खबाले कृष्ठरोगतज्ञ कोळी मॅडम,शशिकांत चोपडे,क्षयरोगतज्ञ हणमंत यादव,पाटील मॅडम ,किशोर बडेकर आशा गटप्रवतॅक डुबल मॅडम व प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले सर्व आशा सेविका व स्वयंसेवक।आरोग्य कर्मचारी
आरोग्य सहाय्यक जे.एफ.पावरा आरोग्य सहाय्यिका के एम.काबळे डी.आर थोरात,
आरोग्य सेवक रोहित भोकरे
आरोग्य सेवक विलास फाळके
आरोग्य सेविका ए.एम.कांबळे,
जे आर खैरमोडे , परिट एस आर ,
आर जे चोरगे, व्ही एस लोहार,एस आर पवार,कोमल महादर,उपस्थित होते.
फोटो: मान्याचीवाडी येथे सर्व्ह करताना आशासेविका आणि मदतनीस
क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला, ताण येणे, वजनात घट होणे, थुंकीवाटे रक्तजाणे, मानेवर गाठ असणे अशी लक्षणे आढळून आल्यास संशयित म्हणून नोंद घेऊन पुढे थुंकी नमुन्याची तपासणी एक्सरे व सीबीनॅट तपासणी मोफत केली जाणार आहे.
कुष्ठरोगाची लक्षणे
अंगावर चट्टे, हातापायाला मुंग्या येणे, स्नायूमध्ये अशक्तपणा येणे, बधीरता येणे, भुवयाचे केस विरळ होणे, चेहरा तेलकट होणे, तळहात - तळपायात बधीरता जाणवणे अशी लक्षणे असणाऱ्यांची पुन्हा एकदा शास्त्रोक्त तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा