तळमावले/वार्ताहर
कराड येथील शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे महाविद्यालयातील प्रा.अधिकराव बाळासोा कणसे हे आपल्या सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी सेवानिवृत्तीनिमित्त ‘ज्ञानयात्री’ पुस्तक तयार केले होते. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. यावेळी प्रा.अधिकराव कणसे, पत्नी सौ.सुरेखा कणसे, कन्या सौ.मनिषा पवार, सौ.वंदना देसाई, जावई संभाजी पवार, संदीप देसोई, मेहूणे रामचंद्र पाटील, वहीनी मंगल कणसे, सुभद्रा कणसे, वत्सला कणसे, कल्पना कणसे, सौ.सुशीला कदम, सुन सौ.चैत्राली कणासे, मुले श्री.इंद्रजित कणसे, श्री.रणजीत कणसे, नात तीर्था कणसे उपस्थित होते. घरातील सर्व मंडळींच्या साक्षीने प्रकाशित केलेल्या या पुस्तकामुळे कणसे कुटंूबातील सर्वजण भारावून गेले. या पुस्तकात प्रा.कणसे यांच्याविषयी विविध मान्यवरांनी लिहलेले लेख समाविष्ट केले आहेत. या पुस्तकाचे संपादन डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे. प्रा.कणसे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांवर प्रभावीपणे ज्ञानदानाचे काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल विद्यापीठ स्तरावर देखील घेतली आहे. सेवा काळात अनेक गरजू विद्याथ्र्यांना सर्वोतोपरी मदतही त्यांनी केली आहे. त्यामुळे सर्व विद्याथ्र्यांच्यात ते लोकप्रिय होते. याशिवाय राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध गावांमध्ये भरीव योगदान दिले आहे. या सर्व गोष्टींचा उहापोह मान्यवरांनी या पुस्तकात केला आहे.
विशेष म्हणजे प्रा.कणसे हे सामाजिक चळवळीत काम करताना नेहमी अग्रेसर असतात. प्रा.अधिकराव कणसे यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीतील योगदानाबद्दल विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देवून सन्मानित केले आहे. त्यांच्या या पुस्तकाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा