सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

काळगाव ; बिबट्याच्या दर्शनाने डाकेवाडीत घबराट

काळगाव ; बिबट्याच्या दर्शनाने डाकेवाडीत घबराट
छायाचित्र - संग्रहित
तळमावले/वार्ताहर
काळगांव दि.21 पासून जवळच असलेल्या डाकेवाडी या दुर्गम वाडीत गेले दोन ते तीन दिवसापासून अनेक लोकांना बिबट्या विविध ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे डाकेवाडीकरांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. यंदा कोरोनाच्या महामारीमुळे लोक अजूनही त्रासलेल्या अवस्थेत आहेत. ग्रामीण भागात चांगला पाऊसपाणी झाल्याने काही अपवाद वगळता पीके देखील चांगली आहेत. शेतकरी वर्ग पोटच्या पोराप्रमाणे या पिकांची देखभाल करत आहे. भुईमूग, हायब्रीड, भात, सोयाबीन, नाचणी या पिकांची वन्य प्राण्यांकडून नासधूस केली जात आहे. पेरणी झाल्यापासून शेतकरी या पिकांची निगा राखत आहे. परंतू वानरांपासून पिकांचे दिवसाचे रक्षण करावे लागत आहे तर रात्री रानडुकरे व अन्य जनावरांपासून पिकांचे नुकसान करण्यासाठी येथील शेतकरी वर्ग रात्रभर जागा राहत आहे. खोपा करुन जनावरांवर टेहळणी करत आहेत. काही दिवसांवर ही पिकांची काढणी आली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांकडून पिकांचे आणखी नुकसान होवू नये यासाठी शेतकरी वर्ग अधिकच सतर्क राहिला आहे.
परंतू गेले दोन ते तीन दिवसापासून बिबट्याच्या दर्शनामुळे वाडीत घबराट पसरली आहे. यापूर्वी अन्य वाड्या वस्त्यावर बिबट्याकडून नुकसान केल्याच्या बातम्या डाकेवाडीत चर्चिल्या जात होत्या. परंतू आता दस्तूरखुद्द डाकेवाडीतच बिबट्याचे दर्शन झाल्याने लोक चिंतीत आहेत. वनविभाग व संबंधित प्रशासनाकडून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.


पिकांची राखण करताना आम्ही रात्री साडे नऊच्या सुमारास निघालो असता आमच्या पासून काही अंतरावर बिबट्या दिसल्याने आम्ही बॅटरीचा प्रकाश पाडला परंतू आमची जाणीव होताच बिबट्याने रानामध्ये धुम ठोकली आहे. त्यामुळे लोकांनी अंधाराच्या सुमारास बाहेर पडू नये तसेच शेतामध्ये जाताना सतर्कतेने रहावे.
श्री.पांडूरंग जाधव, शेतकरी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...