तळमावले:-
दिवसरात्र आपल्या सेवेसाठी डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आज पुन्हा एकदा माणसातला देव पाहायला मिळत आहे. देशावर मोठं संकट असताना, सगळ्यांनी पळ काढला पण पोलीसवर्ग मात्र न भिता तसाच तिथे काम करत राहिला. यांच्या बद्दल बोलावे तेवढं थोडच आहे.
आपल्या गावातील एकादी व्यक्ती मुंबई / पुण्यावरून आलेला असेल तर आपण विशेष काळजी घेतो.अशा परिस्थिती पण पोलीसवर्ग सध्या जीवाची पर्वा न करता देशसेवा करत असताना दिसत आहे ते आपल्यासाठी दिवस - रात्र एवढं पळतात, आपणही त्यांच्या साठी काहीतरी केलं पाहिजे. सध्या पूर्ण देशामध्ये कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे. सर्व शहरे गावोगावी सध्या बंद पाळला जात आहे. अशा परिस्थिती मध्ये पोलीस कर्मचारी सध्या आपली सेवा करत आहे. दिवसभर उन्हामध्ये तापत आहे. नाष्टा चहा पाण्याची सर्व हॉटेल लॉक - डाऊन केलेली आहेत.आपल्याला जमेल अशी आपल्या माणसातल्या देवासाठी चहा, नाष्टा, पाणी याची सोय कृपया करावी. आणि त्यांना सहकार्य करावे, गर्दी करणं टाळावं. त्यांना न इलाजाने लाठीचार्ज करावा लागेल असे वागू नये. गावभर उगाच फिरू नये. आपल्यामुळे संसर्ग वाढेल असे काहीच करू नये अत्यावश्यक कामा शिवाय घरातून बाहेर पडू नये. सरकार ने दिलेल्या सर्व सूचना पाळाव्यात. आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे त्यांना पण थोडा मोकळा श्वास घेण्यास मदत होईल.
पोलिसाबरोबर हुज्जत घालू नका त्यानां त्याचे काम करू द्या
कोरोना प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापि सहन केल्या जाणार नाहीत. असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा