सोमवार, २ डिसेंबर, २०१९

पंजाब & महाराष्ट्र बँक खातेदारांना मोठा 'दिलासा' देणारा निर्णय



मुंबई : कुमजाई पर्व ऑनलाइन - 

पंजाब आणि महाराष्ट्र  बँक खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास 78 टक्के खातेदारांना त्यांच्या खात्यातील सर्व रक्कम काढण्याची मुभा मिळाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत बोलताना ही माहिती दिली. प्रमोटर्सच्या मालमत्ता आरबीआयला देण्यात आल्या आहेत. याच मालमत्तांच्या लिलावातून आलेले पैसे खातेदारांना देण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.

दरम्यान बँकेचा घोटाळा समोर आल्यानंतर अनेक खातेदारांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. पैसेच काढता येत नसल्याच्या धक्क्याने अनेक खातेदारांनी जीव गमावला. दैनंदिन व्यवहार, शाळा कॉलेज यांचे शुल्क न भरता आलेल्या अनेक पालकांना आपल्या पाल्यांसाठी दागिणे देखील गहाण टाकावे लागेल.

अर्थमंत्री मुंबईत आल्यानंतर खातेदारांनी अनेक आंदोलने काढली. त्यावेळी सरकारकडून त्यांना आश्वस्त करण्यात आले होते.

जस-जसे बँक घोटाळाचे पैलू बाहेर येत गेले तसं तसे कर्जासाठी 21 हजार बनावट खाती तयार केल्याची बाब समोर आली. पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत या बाबी उघड झाल्या.

आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल तक्रारीत म्हणले आहे की बँकेच्या व्यवस्थापनावर असे निष्पन्न झाले की त्यांची मालमत्ता लपवली जात नाही आणि कर्ज वितरित केले गेले. ज्या कारणाने 4,355 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तक्रारीत म्हणल्या प्रमाणे एकच रियल्टी फर्म आणि त्यांच्या ग्रुप कंपन्याचे 44 कर्जाचे लाभार्थी होते. तक्रारीत बँकेचे अध्यक्ष वरम सिंग आणि व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांच्यासह अन्य बँक अधिकाऱ्यांची नावे आहेत त्यांच्यावर खोटेपणा आणि खोट्या नोंदी केल्याच्या गुन्हेगारी आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रणजीत सिंग यांना या प्रकरणी अटक केली होती. रणजीत सिंग पीएमसी बँकेचे माजी संचालक आहेत, तसेच माजी भाजप आमदार तारा सिंग यांचे पुत्र आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 4,355 कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणात दोन ऑडीटर्सना अटक केली आहे.

जेव्हा हा घोटाळा झाला तेव्हा जयेश संघानी आणि केतन लकडावाला स्टॅच्युटरी ऑडिटर होते. या प्रकरणात बँकेचे मोठे अधिकारी देखील गुंतलेले आहेत. बँकेत झालेल्या गैरप्रकारात जयेश आणि केतन यांची महत्वाची भूमिका असल्याचा संशय आहे.


*साप्ताहिक*

📄📄📄

*कुमजाई पर्व*

📖📖📖📖👍👍👍👌👌 *न्यूज अपडेट* *बातम्या व जाहिराती साठी संपर्क*

*संपादक* : 

*प्रदीप विष्णू माने* 

*8108253323* 

*9920057878* 

👌👌👍👍🍹📄📄📄📄✒✒✒✒🖋🖋🖋🖋🖋


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...