ध्यानाचे फायदे
भावनिक स्थिरता आणि सुसंवाद: ध्यान केल्याने आंतरिक शुद्धी होते आणि मानसिक स्तरावर पोषण मिळते. ज्या ज्या वेळी आपल्या भावना उफाळून येतात, आपल्याला मानसिक अस्थिरता वाटते, भावनांचा अतिरेक होतो, त्या त्या वेळी मन शांत करण्यास ध्यान मदत करते.
समस्त सृष्टीशी सुसंगती: जेव्हा तुम्ही ध्यान करता त्यावेळी तुमचे मन आकाशाची विशालता, शांतता आणि आनंदाने भरून जाते आणि ह्याच गोष्टी तुम्ही वातावरणात पसरवता व सृष्टीमध्ये सुसंगती निर्माण करता.
आत्मविकास: रोजच्या आयुष्यात जर आपण ध्यानाला जागा दिली तर आत्म्याचा विकास होते, व हळूहळू विकसित आणि शुद्ध चेतना म्हणजे काय याचा अनुभव होतो.
जेव्हा आत्मा विकसीत आणि विशाल होते त्यावेळी आयुष्यातील क्षोभ अगदी नगण्य होऊन जातो. राग आणि निराशा ह्या भावना क्षणिक होऊन जातात. तुम्ही वर्तमानात जगायला सुरुवात करता आणि भूतकाळातल्या गोष्टींना "झालं ते गेलं" च्या नजरेने पाहता.
वैयक्तिक परिवर्तन: ध्यान हे तुमच्यात खरेखुरे वैयक्तिक परिवर्तन आणू शकते. स्वत: विषयी ज्यावेळी तुम्हाला अधिक समजायला लागते त्यावेळी स्वाभाविकपणे आयुष्याचे रहस्य, विश्वाचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. आणि मग "आयुष्याचा अर्थ काय? आयुष्याचा हेतू काय? विश्व म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? वगैरे वगैरे असे प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतात.
ज्यावेळी हे प्रश्न तुमच्या मनात यायला लागतील त्यावेळी हे नक्की समजा की तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. हे प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. ह्या प्रश्नांची उत्तरे एखाद्या पुस्तकात वगैरे मिळणार नाहीत. ह्या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता तुमचे जीवन एका उच्च स्तरावर गेलेले पहाल.असे या ध्यान कार्यशाळेचे फायदे आहेत.