बुधवार, ९ डिसेंबर, २०२०

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरावर


मुंबई दि.9 ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (गुरूवार दि.10 डिसेंबर) सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी करतील.

मुख्यमंत्री ठाकरे यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे -

गुरूवार दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 9.05 वा. जुहू विमानतळ येथून हेलिकॉप्टरने कोयनानगर (ता.पाटण, जि. सातारा)कडे प्रयाण.

सकाळी 10.00 वा. कोयनानगर हेलिपॅडवर आगमन व मोटारीने रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी जलविद्युत प्रकल्पाकडे प्रयाण.सकाळी 10.50 वा. पोफळी जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा 4 विद्युतगृहाची पाहणी.

सकाळी 11.20 वा मोटारीने कोयना धरण (ता.पाटण, जि. सातारा)कडे प्रयाण.

दुपारी 12.05 वा. कोयना धरण येथे आगमन व परिसराची पाहणी.

दुपारी 12. 40 वा कोयना विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

दुपारी 1.10 वा. मोटारीने कोयनानगर हेलिपॅडकडे प्रयाण व हेलिकॉप्टरने ओझर्डे (ता. मावळ, जि. पुणे) कडे प्रयाण.

दुपारी 2.00 वा. ओझर्डे हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदा क्र. 2 च्या प्रकल्पस्थळाकडे प्रयाण.

दुपारी 2.20 वा. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या दरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची पाहणी व त्यानंतर मोटारीने प्रकल्पाच्या कॅम्प ऑफिसकडे प्रयाण.

दु. २.५० वा. कॅम्प ऑफिस येथे आगमन व मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली-कुसगाव दरम्यानच्या नवीन बांधकामाचे सादरीकरण.

दु. ३.१५ वा. मोटारीने ओझर्डे (ता.मावळ, जि. पुणे) हेलिपॅडकडे प्रयाण.

दु. ३.३० वा. ओझर्डे हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

थकीत कर्ज न भरणाकेल्याने दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल.

कर्ज न भरणार्‍यास दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल. पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत...